Most Ducks in IPL : इंडियन प्रीमियर लीग 2024 ची तयारी जोरात सुरू आहे. बीसीसीआयने आगामी हंगामाच्या पहिल्या 17 दिवसांत खेळल्या जाणाऱ्या 21 सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 22 मार्चला होणार आहे. अशा स्थितीत क्रिकेटच्या गल्लीबोळात आता फक्त आयपीएलचीच चर्चा होत आहे.
तर, या लेखात आम्ही तुम्हाला आयपीएलच्या एका रंजक विक्रमाबद्दल सांगणार आहोत. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.
10 – हरभजन सिंग, पार्थिव पटेल, अजिंक्य रहाणे हे तिन्ही फलंदाज प्रत्येकी 13-13 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
9- अंबाती रायुडू : अंबाती रायडूने आतापर्यंत 204 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो 14 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
8- मनीष पांडे : मनीष पांडे या यादीत 8 व्या स्थानावर आहे, ज्याने आतापर्यंत 170 आयपीएल सामने खेळले आहेत. या काळात तो 14 वेळा खाते न उघडता शून्यावर बाद झाला आहे.
7- ग्लेन मॅक्सवेल : ग्लेन मॅक्सवेलने आतापर्यंत 124 इंडियन प्रीमियर लीग सामने खेळले आहेत. या काळात तो 14 वेळा खाते न उघडता शून्यावर बाद झाला आहे.
6- पियुष चावला : पियुष चावलाने 181 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो 14 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.
5- राशिद खान : गुजरात टायटन्सचा स्टार क्रिकेटर राशिद खानने 109 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो 14 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.
4 – मनदीप सिंग : मनदीप सिंग या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, जो 111 सामन्यांमध्ये एकूण 15 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.
3- सुनील नरेन : सुनील नरेन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, जो 162 आयपीएल सामन्यांमध्ये 15 वेळा खाते न उघडताच तंबूत परतला आहे.
WPL 2024 ( #MIvRCB #Eliminator ) | मुंबई-बंगळुरु आज आमने-सामने, लढतीतील विजेता संघ…
2- रोहित शर्मा : भारताचा स्टार फलंदाज व मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचे नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो 243 सामन्यांमध्ये 16 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.
1- दिनेश कार्तिक : अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने 242 सामने खेळले आहेत आणि या काळात तो खाते न उघडता सर्वाधिक म्हणजे 17 वेळा शून्यावर बाद झाला आहे. ( Overall IPL history Dinesh Karthik sits at the top of the list with most number of ducks in IPL )