एमएसएलटीए तर्फे 146 हून अधिक स्पर्धांचे आयोजन

पुणे  – 2019 मध्ये एआयटीए कॅलेंडरमधील इतर राज्यांच्या तुलनेत एमएसएलटीए तर्फे 146 हून अधिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 10 आंतरराष्ट्रीय स्पर्धा, 87 एआयटीए मानांकन स्पर्धा (12, 14, 16 वर्षाखालील 3 राष्ट्रीय मानांकन, 2 नॅशनल सिरीज, 7 सुपर सिरीज, 51 चॅंपियनशीप सिरीज, 24 टॅलेंट सिरीज), 14 पुरूष व महिला राष्ट्रीय मानांकन, 33 राज्य (10वर्षाखालील) मानांकन स्पर्धांसह 2 प्रौढ आणि आंतर क्‍लब अजिंक्‍यपद स्पर्धा, जुनिअर टेनिस लीग, राज्यस्तरावर रोड टू एमएसएलटीए स्पर्धांचा समावेश आहे.

मुंबई विभागांत 55 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 1 आंतरराष्ट्रीय स्पर्धा, पुणे विभागात 17 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 7 आंतरराष्ट्रीय स्पर्धा, कोल्हापुर विभागात 25 स्पर्धा, नवी मुंबई विभागात 6 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 1 आंतरराष्ट्रीय स्पर्धा, नागपुर विभागात 12 स्पर्धा, औरंगाबाद विभागात 14 स्पर्धा, सोलापुर विभागात 5 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून 1 आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि नाशिक विभागात 12 स्पर्धांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.