सनगार्ड, आयरिसर्च, डिसॉल्ट, परसिस्टंट संघाचे विजय

पुणे  – सनगार्ड, आयरिसर्च, डिसॉल्ट, परसिस्टंट या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या प्रथम व्हिन्टेज कप आयटी टी-20 क्रिकेट स्पर्धेत आगेकूच नोंदवली आहे.

मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर व पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. येथे झालेल्या लढतीत सनगार्ड संघाने मिंडट्री संघावर 9 गडी राखून सहज मात केली. मिंडट्री संघाला 8 बाद 80 धावाच करता आल्या. सनगार्ड संघाने विजयी लक्ष्य 1 गडीच्या मोबदल्यात 5.3 षटकांतच पूर्ण केले. यात पार्थ शर्माने 28 चेंडूंत 12 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 80 धावा केल्या. यानंतर आयरिसर्च संघाने अटॉससिन्टेल संघावर 23 धावांनी मात केली.

आयरिसर्च संघाने प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 191 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अटॉससिन्टेल संघाला 6 बाद 168 धावाच करता आल्या. डिसॉल्ट संघाने कॉग्निझंट संघावर 4 गडी राखून मात केली. यानंतर परसिस्टंट संघाने एफआयएस ग्लोबल संघावर 42 धावांनी विजय मिळवला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.