पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत एमडब्लूटीए संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रदीप मेड, मंदार वाकणकर, आशिष मणियार,सुनील लुल्ला, प्रविण पांचाळ, सुमंत पॉल यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर एमडब्लूटीए अ संघाने सोलारिस 2 संघाचा 24-06 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
दुसऱ्या सामन्यात एसपी कॉलेज 1 संघाने सोलारिस गो गेटर्स संघाला 20-14 असे पराभूत केले. विजयी संघाकडून प्रमोद पाटील, मंदार मेहेंदळे, उमेश भिडे, संतोष शाह, आदित्य जोशी, स्वेतल शहा यांनी अफलातून कामगिरी केली.