34,542 क्वारंटाइन व्यक्तींची संख्या : दिवसांत 46 मृत्यूंची नोंद
पुणे – शहरात करोना संसर्ग कमी होत असल्याने पुणेकरांना दिलासा मिळत आहे. मात्र, मृत्यूचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 46 जणांचा मृत्यूची नोंद झालेली आहे. तर ग्रामीण आणि अन्य जिल्ह्यांतील 11 अशा 57 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी बाधितांपेक्षा करोनामुक्त व्यक्तीची संख्या अधिक आहे. दिवसभरात 1 हजार 49 जण करोनामुक्त झाले आहेत. तर नव्याने 835 बाधित सापडले आहेत.
सोमवारी (दि.17) दिवसभरात 4 हजार 635 संशयितांची तपासणी करण्यात आली. शहरात आतापर्यंत 58 हजार 706 जण करोनामुक्त झाले असून, 1 हजार 785 जणांचा मृत्यू झाला आहे.
सद्यःस्थितीत शहरातील विविध रुग्णालयांत 14 हजार 442 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 765 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 464 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले असून, 301 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. क्वारंटाइन व्यक्तींची संख्या 34 हजार 542 वर पोहचली आहे. रविवारी नव्या बाधितांची संख्या दीड हजारांवर गेली होती. पण, मागच्या काही दिवसांत नवे बाधित कमी होत असल्याचे चित्र आहे.