महाराष्ट्रात मान्सून आला…

पुणे – कोकणात रेंगाळलेल्या नैऋत्य मोसमी (मान्सून) पावसाने सोमवारी (दि. 24) जोरदार वाटचाल करत, संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व्यापून कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्राच्या मालेगावपर्यंतचा भाग व्यापला आहे. रविवारी मान्सूनने मोठा टप्पा पार करताना जवळपास निम्मे राज्य व्यापले होते. आज मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मान्सूनची वाटचाल यंदा अडखळत सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात दाखल होताच मान्सूनने वेग धरला आहे. दरम्यान, 18 मे रोजी अंदमानात दाखल झालेला मान्सून आठवडाभरानंतर थोडीशी वाटचाल केली. 30 मे रोजी मान्सूनने संपूर्ण अंदमान व्यापून अरबी समुद्राकडे वाटचाल केली. 5 जून रोजी श्रीलंका देशाचा जवळपास निम्मा भाग व्यापला. तर यंदा तब्बल आठवडाभर उशीराने 8 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर दक्षिण अरबी समुद्रासह,लक्षद्वीप बेटांचा उर्वरीत भागत, केरळचा बहुतांशी भाग, तामिळनाडूच्या आणखी भागात मान्सूने प्रगती केली. 14 जून रोजी दक्षिण कर्नाटकातील मंगळूरू, मैसूरपर्यंत मान्सूनने मजल मारली.

त्यानंतर मान्सूनच्या वाटचालीवर अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळामुळे परिणाम झाला. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावला तसेच बाष्प ओढून नेल्याने पाऊसही लांबला. त्यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन उशिरा 20 जून रोजी झाले. 1972 नंतर यंदा सर्वात उशीरा मान्सून तळ कोकणात पोचला. त्यानंतर मान्सूनचा प्रवासाला वेग मिळाला आहे. गेल्या 24 तासात कोकण-गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मुंबईत मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×