मुंबई – शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता भाजप नेत्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अशातच भाजपा नेते मोहित कंबोज यांनीही ट्विट करत उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला दिला आहे.
Choice Is Yours ! pic.twitter.com/bUE8L4cRNf
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) October 8, 2022
त्यांनी ट्विट केले आहे की,’गर्व कुणालाही सोडत नाही. दुसऱ्यांचं घर तोडायला जे निघाले होते त्यांचं स्वःताचं घर कधी बर्बाद झालं ते त्यांनाही कळलं नाही. ईश्वराच्या लाठीत आवाज नसतो. कोण म्हणतं अहंकार फक्त रावणाला मारतो. अहंकार धनुष्यबाणालाही मारतो असं म्हणत त्यांनी मर्सिडिसचा लोगो आणि पेग्विंग शेअर करत चॉईस इज यूअर असं कॅप्शन देत कंबोज यांनी खोचक सल्ला दिला आहे.
घमंड किसी का भी नहीं रहता , दूसरों का घर तोड़ने चले थे ख़ुद का घर कब बर्बाद हो गया पता ही नहीं लगा !
ईश्वर की लाठी में आवाज़ नहीं होती !
कौन कहता है अहंकार सिर्फ रावण को मारता है। अहंकार धनुष-बाण को भी मार देता हैं ।हर हर महादेव !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) October 9, 2022