मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते मोहीत कंबोज महाविकास आघाडीतील नेतेमंडळींवर सात्याने टीका करत असताना पाहायला मिळाले. दरम्यान, आता त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांच्या दिशेने वळवला असल्याचे दिसत आहे. मोहीत कंबोज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून रोहित पवार यांना लक्ष्य करत रविवारी सकाळी एका पाठोपाठ तीन ट्वीट केले आहेत. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी त्यांनी रोहीत पवार यांचे नाव घेतले आहे. एवढंच नाही तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावरून देखील खोचक टोला लगावला आहे.
आपल्या ट्वीटमध्ये मोहीत कंबोज यांनी घोटाळ्यांमध्ये सगळी चूक भाजपाचीच आहे, अशा शब्दांत खोचक टोला लगावला आहे. “२००६ मध्ये भाजपानेच रोहीत पवार यांना पीएमसी बँक आणि एचडीआयएल घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांचे पार्टनर बनायला भाग पाडलं”, असे देखील मोहीत कंबोज ट्वीटमध्ये खोचकपणे म्हणाले आहेत
.
In 2006 BJP Leaders Forced Shri Rohit Pawar To Become Partner With #PMCBank #HDIL Scam Rakesh Wadhawan ,From 2006 to 2012 Crores Of Transactions Done In Start Up Company Green Acre Resorts Which Do Business From Jewellery To UnderGarments to RealEstate.
सब गलती भाजपा की है जी 🤣 pic.twitter.com/rET20rTgw5— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 28, 2022
घोटाळे समोर आल्यानंतर भाजपाला दोष दिला जातोय, असे कंबोज ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. “स्वत: सगळे घोटाळे करून आता ते समोर आल्यावर भाजपाला दोष देण्याचा हा एक नवीन धंदा आहे. जर तुम्ही काही चुकीचं केलंच नाहीये, तर मग घाबरण्याचं काय कारण? खरा माणूस कधीच कोणत्या चौकशीला घाबरत नाही. ज्याच्या मनात चोर आहे, तोच घाबरतो. ज्यांची घरं काचेची असतात, ते दुसऱ्यांच्या घरांवर दगड मारत नाही”, असे मोहीत कंबोज भारतीय यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे.
In 2006 BJP Leaders Forced Shri Rohit Pawar To Become Partner With #PMCBank #HDIL Scam Rakesh Wadhawan ,From 2006 to 2012 Crores Of Transactions Done In Start Up Company Green Acre Resorts Which Do Business From Jewellery To UnderGarments to RealEstate.
सब गलती भाजपा की है जी 🤣 pic.twitter.com/rET20rTgw5— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 28, 2022
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बोलबच्चन आहेत, अशा आशयाचा टोला कंबोज यांनी लगावला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक बोलबच्चन होते..मियाँ नवाब मलिक (सलीम) आणि शिवसेनेत संजय राऊत (जावेद)! आता वाटतंय की या दोघांच्या जागांसाठी त्यांच्या पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. चालू द्या, पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका”, असे देखील कंबोज या ट्वीटमध्य म्हणाले आहेत.
NCP में एक Bol Bachchan था मियाँ नवाब मलिक ( सलीम ) और सेना में संजय राउट ( जावेद ) !
लगता है दोनो कि जगह पार्टी में भरने के लिए Competition चालू हैं !
लगे रहो लेकिन नवाब और राउट मत बनना !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 28, 2022
मोहीत कंबोज यांच्या या ट्वीटमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्याने कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.