मुंबई -अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची सुंदर मुलगी शनाया कपूर पुन्हा एकदा तिच्या देशी लूकने चर्चेत आली आहे. पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटोशूट लोकांना वेड लावत आहेत.
View this post on Instagram
चित्रपटसृष्टीत जेव्हा कधी पार्टी असते तेव्हा सर्व सेलेब्स या पार्टीला हजेरी लावतात. अशाच एका पार्टीत शनाया कपूर पारंपरिक लूकमध्ये पोहोचली. हि पार्टी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर कुणाल रावल याच्या लग्नाची होती.
या पार्टीत शनाया साडी लुकने चाहत्यांना वेड लावले. स्लीव्हलेस ब्लाउजसह पांढऱ्या साडीत शनाया सुंदर दिसत आहे. शनायाच्या या फोटोंवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. काही हार्ट तर काही फायर इमोजी पोस्ट करत आहेत.
View this post on Instagram
कुणाल रावलच्या पार्टीत शनाया तिचे चुलत भाऊ मोहित मारवाह आणि अंशुला कपूरसोबत पोज देताना दिसली. शनायाने इंस्टाग्रामवर सर्व छायाचित्रे शेअर केली आहेत. शनाया कपूरचे चुलत भावांसोबत खूप चांगले संबंध आहेत. बॉलिवूडमध्येही तिची एन्ट्री होणार आहे. करण जोहर तिला लॉन्च करणार आहे.