Indian Premier League 2024 : एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर मोहम्मद शमीने एकही सामना खेळलेला नाही. घोट्याच्या दुखापतीमुळे तो क्रिकेटपासून दूर आहे. आता अहवालात समोर आले आहे की, शमी काही दिवसांनी सुरू होणाऱ्या आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. शमीचे स्पर्धेतून बाहेर पडणे गुजरात टायटन्ससाठी मोठा धक्का ठरू शकतो.
शमी हा गुजरातचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. गेल्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने 17 सामन्यांत 18.61 च्या उत्कृष्ट सरासरीने 28 बळी घेतले. या काळात त्याने 2 वेळा ‘चार विकेट्स’ घेतल्या होत्या.
‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेचा हवाला देत बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे शमी आयपीएलमधून बाहेर आहे. शमीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागणार असून, ही शस्त्रक्रिया ब्रिटनमध्ये होणार आहे.
India pacer Mohammed Shami ruled out of IPL due to left ankle injury which would require surgery in the UK: BCCI source tells PTI
— Press Trust of India (@PTI_News) February 22, 2024
दरम्यान, शमीला 2022 च्या मेगा लिलावात गुजरात संघाने 6.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते, त्यानंतर तो संघासाठी एक यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी शमी पंजाब किंग्जचा भाग होता. शमीने आतापर्यंत एकूण 110 आयपीएल सामने खेळले आहेत, 110 डावात गोलंदाजी करत त्याने 26.86 च्या सरासरीने 127 विकेट्स घेतल्या आहेत.
2023 च्या विश्वचषकात ठरला होता यशस्वी गोलंदाज….
शमीने 2023 मध्ये भारतीय भूमीवर खेळलेल्या एकदिवसीय विश्वचषकात आश्चर्यकारक कामगिरी केली. 2023 च्या स्पर्धेद्वारे, शमी विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. भारतीय वेगवान गोलंदाजाने 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत केवळ 7 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 10.71 च्या उत्कृष्ट सरासरीने 24 विकेट घेतल्या. स्पर्धेतील पहिल्या चार सामन्यांत तो बाहेर होता.