पुणे: देहूरोड येथे भाजप कार्यालयासमोर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फ्लेक्स ला दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी शेण फासण्याचे कृत्य केले आहे. देहूरोड बाजारपेठेमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास हि घटना घडली आहे. घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
दरम्यान सकाळी पक्ष कार्यालयाची साफसफाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यास ही बाब निदर्शनास आली. या घटनेची माहिती तत्काळ देहूरोड शहरातील भाजपचे पदाधिकारी तसेच पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत फ्लेक्स हटवून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावरून मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हे कृत्य केल्याच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे.