मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना दिला ‘हा’ संदेश

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र यांनी ‘मन की बात’ कार्क्रमातून जनतेशी संवाद साधला. पंतप्रधानांचा या वर्षीचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. यापूर्वी 29 डिसेंबर रोजी पंतप्रधानांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून संवाद साधला होता.

‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, विद्यार्थ्यांसोबत परीक्षा विषयावर चर्चा केल्यानंतर मला वाटते कि , देशातील तरुण आत्मविश्वासाने भरलेल्या आहे. देशातील तरुण सर्व आव्हानं पेलण्यासाठी सज्ज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना  शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, शाळांमध्ये अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना शारीरिक उपक्रमाविषयी जागरूक केले पाहिजे. देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच शारीरिक उपक्रमात भाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे. विद्यार्थ्यांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावे, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, देशातील सर्व शाळांना माझी विनंती आहे, की शिक्षणाबरोबर शारीरिक उपक्रमाला खेळांची जोड द्यावी. गेल्या वर्षी सुरू झालेल्या फिट इंडिया मोहिमेत आतापर्यंत 65 हजार शाळांनी नोंदणी केली आहे.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here