पश्चिम बंगाल, वीरभूम : बंगालमध्ये भाजपाला 8 जागेवर विजय मिळाला आणि नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाले तर मी राजकारण सोडेल, असं विधान तृणमूल काँग्रेस पक्षाचे वीरभूम जिल्हाध्यक्ष अनुब्रत मंडल यांनी मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करताना केले आहे.
ते जिल्ह्यातील हांसन येथील एका प्रचारसभेस संबोधित करत होते. शाह यांना आव्हान देताना ते म्हणाले की, हिमंत असेल तर अमित शाह यांनी वीरभूम येथून निवडणूक लढावावी. मी त्यांना 5-6 लाख मतांनी हरवेल.
पुढे बोलताना अनुब्रत मंडल म्हणाले की, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी अलीपुरव्दार येथील सभेत पश्चिम बंगालमध्ये 23 जागा जिंकण्याचा दावा केला होता. पण मी वादा करतो की, जर भाजपाला बंगालमधून 8 जागा मिळाल्या आणि मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाले तर मी राजकारण सोडून देईल.
मंडल यांनी पंतप्रधान मोदी यांना बेईमान देखील म्हटले. तसेच 2019 निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये 42 च्या 42 जागा तृणमूलला मिळतील असा दावादेखील केला.