नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा डंका जगभरात वाजतो आहे कारण जगप्रसिद्ध नेत्यांच्या यादीत सर्वात प्रसिद्ध नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अव्वल क्रमांकावर आहेत. World Of Statistics या ट्विटर हँडलने याविषयीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७६ टक्के रेटिंगसह पहिल्या क्रमांकाची पसंती देण्यात आली आहे.
World of Statistics या ट्विटर हँडलने दिलेल्या माहितीनुसार ७६ टक्के लोकांनी मोदींना सर्वात लोकप्रिय नेते म्हणून पसंती दिली आहे. ७६ टक्के हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं रेटिंग आहे. लोकप्रिय नेत्यांच्या यादीत जो बायडेन यांच्या लोकप्रियतेच्या रेटिंगचं प्रमाण ४० टक्के आहे. तर ऋषी सुनक यांच्या लोकप्रियतेचं रेटिंग प्रमाण ३१ टक्के आहे. सगळ्याच प्रसिद्ध नेत्यांची यादी या ट्विटर हँडलने पोस्ट केली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानी आहेत.
World’s most popular leaders (approval rating):
🇮🇳 Narendra Modi: 76%
🇨🇭 Alain Berset: 60%
🇲🇽 Andrés López: 59%
🇦🇺 Anthony Albanese: 54%
🇮🇹 Giorgia Meloni: 52%
🇧🇷 Lula da Silva: 51%
🇪🇸 Pedro Sánchez: 40%
🇺🇸 Joe Biden: 40%
🇨🇦 Justin Trudeau: 40%
🇧🇪 Alexander De Croo: 39%…— World of Statistics (@stats_feed) June 25, 2023
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर 89.5 मिलियन ऑफोअर्स आहेत. जगातले सर्वात लोकप्रिय नेते असा त्यांचा लौकिक आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ करतात त्यामुळे त्यांची लोकप्रियता इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात रेडिओ हा आऊटडेटेड वाटत असला तरीही त्यावरुन मोदी संवाद साधतात. ही बाब अनेकांना भावली आहे त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत भर पडली आहे. या माध्यमातून लोकांशी संवाद साधणं हे लोकांना भावले आहे.
ऑगस्ट २०२२ मध्येही अशाच पद्धतीचा एक सर्व्हे करण्यात आला होता. त्याॉवेळीही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच क्रमांक एकवर होते. ७५ टक्के रेटिंगसह त्यांना सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून पसंती दर्शवली होती. मॉर्निंग कंसल्टने ही टक्केवारी सादर केली होती.