चिंचवड मतदारसंघात बॅटच्या साथीने विजयी षटकार

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ मनसैनिक सर्व ताकदीनिशी प्रचारात उतरले आहेत. या मतदार संघात बॅटच्या साथीने मनसे प्रस्थापितांचा त्रिफळा उडविणार, असा विश्‍वास वाकड येथे आज (मंगळवार) झालेल्या बैठकीत मनसैनिकांनी व्यक्‍त केला.

उमेदवार राहुल कलाटे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, उपाध्यक्ष राजू सावळे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अश्‍विनी बांगर, उपाध्यक्षा अनिता बांगर, सचिव सीमा बेलापूरकर, रुपेश पटेकर, हेमंत डांगे, मयूर चिंचवडे आदी उपस्थित होते. बैठकीत राहुल कलाटे यांच्या प्रचाराच्या रणनितीवर चर्चा झाली. चिंचवड विधानसभा मतदार संघातील महापालिकेच्या 13 प्रभागांमध्ये मनसैनिकांवर स्वतंत्रपणे प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रचारच्या अखेरच्या टप्प्यात रॅली, पदयात्रा, कोपरा सभांवर भर देण्याबाबत चर्चा झाली.

सचिन चिखले म्हणाले की, मनसे तिन्ही विधानसभा मतदार संघात ताकदीने उतरली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या शाश्‍वत व समतोल विकासासाठी तसेच प्रस्थापितांच्या मनमानी कारभाराविरोधात राहुल कलाटे यांना साथ देण्याचे आदेश पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. मनसेैनिकांवर प्रभागनिहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियोजनबद्ध तसेच राहुल कलाटे यांच्या खांद्याला खांदा लावून मनसैनिक काम करीत आहेत. प्रचारात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, अशी ग्वाही
त्यांनी दिली.

राहुल कलाटे म्हणाले की, मनसेची साथ मिळाल्याने चिंचवड विधानसभा मतदार संघात परिवर्तनाची चाहूल लागली आहे. प्रचारात मनसैनिकांना मानाचे स्थान दिले जाईल. एकमेकांच्या साथीने मतदार संघात आपण इतिहास घडविणार आहोत. समतोल आणि सर्वंकष विकासासाठी प्रत्येक मनसैनिकाने आपल्याला साथ द्यावी, अशी साद राहुल कलाटे यांनी यावेळी घातली. दरम्यान आज रावेत परिसरात राहुल कलाटे यांनी पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.

दरम्यान आज रावेत परिसरात राहूल कलाटे यांनी पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. विकासनगर, सिद्धीविनायक कॉलनी, अवधूत कॉलनी, भिमाशंकर कॉलनी, तुकाराम अण्णा भोंडवे चौक, पोलीस पाटील चौक, रावेत, धर्मराज मंदिर, महादेव मंदिर, राजमाता चौक तसेच परिसरातील विविध भागातून रॅली काढण्यात आली.

रावेत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये रॅलीची सांगता झाली. रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे, नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, युवा सेनेचे पदाधिकारी दिपक भोंडवे, लिंगायत समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामू देशींगे, किवळ्याचे माजी उपसरपंच बापू तरस यांच्यासह दिपक जाधव, दत्ता तरस, सुनील भोंडवे, विविध पक्षांचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील शेकडो मतदार सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.