मुंबई : मागच्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय तर्क-वितर्क लढवले जात होते. या घटनेला काही दिवसच उलटले असताना आता आणखी एका मनसेच्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतल्याने चर्चांणा उधाण आले आहे.
मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदिप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा निवसस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. गणपती दर्शनासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संदिप देशपांडे यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
संतोष धुरी, शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकरही तेव्हा उपस्थित होते. मुंबई महापालिका, ठाणे महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकतो. त्यात मनसे नेत्यांचे ‘वर्षा’वर येणं जाणं वाढले आहे.
गणपती दर्शन हे कारण असले तरी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट-मनसे एकत्र लढणार का, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहे.