MLA Disqualification : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (बुधवार) आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय दिला. अध्यक्ष नार्वेकर यांचा निर्णय उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होईल असा दावा उद्धव ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येत होता. मात्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर हा दावा फोल ठरला आहे.
विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केलं आहे.
शरद पवार यांचा गंभीर आरोप
शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाबाबत बोलताना, सत्ताधाऱ्यांना निकालाची पूर्वकल्पना होती असा गंभीर आरोप केला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांना न्यायालयात जावे लागेल असेही पवार यांनी म्हंटले आहे.
शिंदेंच्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई नाही, ठाकरेंचे १४ आमदारही पात्र
विधानसभा अध्यक्षांनी आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देताना दोन्ही बाजूच्या परस्परविरोधी याचिका फेटाळल्या आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांचे १६ आमदार तसेच उद्धव ठाकरे यांचे १४ आमदार अपात्रतेच्या कारवाईपासून बचावले आहेत.
मात्र नार्वेकर यांनी खरी शिवसेना शिंदेंची असल्यावर शिक्कामोर्तब केल्याने, यापुढे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून (शिवसेना) बजावण्यात येणारे व्हीप उद्धव ठाकरे समर्थक आमदारांनाही लागू असतील. त्यामुळे पुढं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल.
Shivsena | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Aamdar Apatrata Prakaran | Vidhansabha Adhyaksha | MLA Disqualification | Live | Rahul Narvekar |