Shivsena MLA Disqualification Result : गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षांसमोर सुरु असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय अखेर आज जाहीर केला.अध्य्क्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांचा गटचं अधिकृत शिवसेना असल्यावर शिक्कामोर्तब केलं. यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार नाहीत हे स्पष्ट झालं.त्यानंतर आता ठाकरे गटाकडून याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. लोकशाहीची ही हत्या आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
नार्वेकरांनी अपात्र कोणालाच केलेलं नाही. मूळ केस अपात्रतेची होती मग तुम्ही आम्हाला अपात्र का केलं नाही.सुप्रीम कोर्टाला जुमानत नाही हे त्यांनी दाखवून दिल आहे. असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचा अपमान केला आहे. पक्षप्रमुखाबाबत ते बरेच काही बोलले मग त्यावेळी ते (शिंदे) कशाच्या जोरावर निवडून आले असा सवाल देखील ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं होत ते न करता नको त्यामध्ये ते घुसले आणि वेळ काढूपणा त्यांनी केला असं स्पष्ट मत यावेळी ठाकरेंनी व्यक्त केलं.
सर्वोच्च न्यायालयाने हे सर्व पाहिलं आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी न्यायालयाने दूध का दूध आणि पाणी का पाणी करावे असं देखील ठाकरे यावेळी म्हणाले. शिंदेंची शिवसेना होऊच शकत नाही नार्वेकरांनी निर्लज्ज पनाचा कळस घातला आहे. आम्हाला हा निकाल अमान्य असल्याचे ठाकरेंनी म्हणाले.