Miss Universe : मिस युनिव्हर्सच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शॅनिस पॅलासिओस हिला मिस युनिव्हर्स 2023 चे विजेती घोषित करण्यात आले आहे. तिला माजी विजेत्या – यूएसएच्या आर’बोनी गॅब्रिएलने मुकुट घातला. मंचावर उपस्थित लोकांनी तिचे खूप कौतुक केले आहे. शॅनिस पॅलासिओस मिस युनिव्हर्स होणारी पहिली निकारागुआ महिला आहे.
MISS UNIVERSE 2023 IS @sheynnispalacio !!!! 🇳🇮👑@mouawad #72ndMISSUNIVERSE #MissUniverse2023 pic.twitter.com/mmR90DJ16m
— Miss Universe (@MissUniverse) November 19, 2023
हे विजेतेपद पटकावल्यानंतर ती खूप आनंदी दिसत होती. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती विजयानंतर भावूक दिसत आहे. या सौंदर्य स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या मोराया विल्सनला द्वितीय उपविजेते, तर थायलंडच्या अँटोनिया पोर्सिल्डला प्रथम उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले.
यावर्षी चंदीगडमध्ये जन्मलेल्या श्वेता शारदाने मिस युनिव्हर्स 2023 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तिने टॉप 20 फायनलिस्टमध्ये स्थान मिळवले. या वर्षी पाकिस्ताननेही पहिल्यांदा मिस युनिव्हर्समध्ये पदार्पण केले आहे. यावर्षी, 72 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत 84 देश आणि प्रदेशातील स्पर्धक एकमेकांशी स्पर्धा केली. अमेरिकन टेलिव्हिजन प्रेझेंटर जीनी माई आणि मिस युनिव्हर्स 2012 ऑलिव्हिया कल्पो यांच्या व्यतिरिक्त अमेरिकन टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता मारिया मेनुनोस यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.