नंदूरबार : राज्यातील सहा जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालाचे कल हाती येता आहेत. ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले केसी पडवी यांच्या पत्नी हेमलता पडवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
गणेश पराडके(शिवसेना) यांनी हेमलता पडवी पराभव केला. धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला नागपूर,आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.
नागपूर आणि पालघर जिल्हापरिषदेत भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. नागपूरमध्ये ५८ जागांपैकी केवळ १० जागा मिळाल्या आहेत. तर पालघर जिल्हापरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेने जोरदार मुसंडी घेतली आहे.