बबनराव लोणीकरांची पैसेवाटप केल्याची कबुली; राष्ट्रवादीची टीका

मंत्री बबनराव लोणीकर यांची पैसेवाटप केल्याची जाहीर कबुली

परतूर: परतूर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी मतदारांना पैसे वाटले असून मीच विजयी होणार, असा वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीयो समोर आला आहे. आपण तांड्यांवर पैसेवाटप केले आहे, अशी बेधडक कबुलीच लोणीकर या व्हीडिओमध्ये देत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. अशाप्रकारे बरळण्याची भाजपाची ही पहिलीच वेळ नाही. आपल्या विजयाचा इतका अतीविश्वास दाखवणाऱ्या या मुजोर नेत्यांना या निवडणुकीत जागा दाखवण्याची वेळ आली आहे. अशा मुजोर मंत्र्यांना पुन्हा निवडून द्यायचे का? असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.