पुणे- आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. ती टिळक रोडवरील स.प. महाविद्यालयाच्या मैदानात होणार आहे. मात्र, त्यापूर्वी कॉलेज मैदानावरील काही वृक्ष कापण्यात आले आहे. दरम्यान, मैदानावरील वृक्ष तोडीच्या निषेधार्थ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहरातील मनपा भवन येथे आंदोलन करण्यात आले आहे.