सरप्राईज… सरप्राईज… सरप्राईज… कंगना राणावतच्या ‘इमर्जन्सी’ची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक मोठं सरप्राईज आहे. अनुपम खेर आणि श्रेयस तळपदे यांच्यानंतर आता मिलिंद सोमणची ‘इमर्जन्सी’मध्ये एन्ट्री झाली आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटात तो सॅम माणेकशॉची भूमिका साकारणार आहे. सॅम माणेकशॉच्या व्यक्तिरेखेतील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे, जो प्रत्येकाच्या कल्पनेपलीकडचा आहे.
कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. लोक हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काय होईल हे येणारा काळच सांगेल. मात्र त्याआधी चित्रपटातील स्टारकास्टचा लूक लोकांना आश्चर्यचकित करणारा आहे.
आधी कंगना राणावत, नंतर अनुपम खेर आणि श्रेयस तळपदे. त्याचवेळी मिलिंद सोमणच्या लूकने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. मिलिंद सोमण फील्ड मार्शल सॅम माणेकशॉच्या भूमिकेतून चाहत्यांची मने जिंकणार आहेत हे पहिल्या लूकने सिद्ध केले आहे. सॅम माणेकशॉ हे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे नायक होते. त्यामुळे त्याला या चित्रपटात सॅम माणेकशॉच्या भूमिकेत पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मिलिंद सोमणबद्दल बोलताना कंगना म्हणते की मिलिंद सोमणची प्रतिभा पाहून तिला तो सॅम माणेकशॉच्या भूमिकेसाठी परफेक्ट वाटला.