पुणे – अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात येणारी “एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा अभ्यासक्रम आणि गुणांची रचना राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना सीईटीची तयारी करावे लागणार आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत सीईटी परीक्षेची प्रक्रिया राबविले जाते. “एमएचटी सीईटी 2022’च्या प्रश्नपत्रिकेत बारावी अभ्यासक्रमावर 80 टक्के आणि अकरावी अभ्यासक्रमावर 20 टक्के प्रश्न विचारले जातील.
राज्यातील करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांचा काही भाग वगळला आहे.
त्याचबरोबर इयत्ता अकरावीचे विषय देखील या परीक्षेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम नीट समजून घेत परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे. तथापि, राज्य सीईटी सेलने एमएचटी सीईटी 2022 मार्किंग स्कीम देखील जारी केली आहे. ही कॉम्प्युटर माध्यमातून होणार असून यामध्ये निगेटीव्ह मार्कींग असणार आहे.
एमएचटी सीईटीच्या प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासाठी जेईई मेन्सच्या बरोबरीची असेल आणि जीवशास्त्राची काठीण्य पातळी “नीट’च्या बरोबरीची असणार आहे.