मंचर -लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे बैलगाडा घाटातून वाद्याच्या आवाजात मिरवणूक काढण्यात आली. शितलादेवी यात्रोत्सवानिमित्त लांडेवाडी येथे सलग दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतींना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शौकिनांच्या गर्दीत संपूर्ण घाट आणि आसपासचा परिसर गर्दीने फुलुन गेला होता.
यात्रेत सहभागी झालेल्या सर्व गाडामालक, गाडा शौकीन, शेतकरी बांधव, शिवसेना पदाधिकारी तसेच या सोहळ्यासाठी गेली 15 दिवस जीवाचे रान करुन योगदान दिलेल्या ग्रामस्थांचे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अभिनंदन केले.
शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांची घाटातुन वाद्याच्या आवाजात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, योगेश बाणखेले, सहसंपर्कप्रमुख सुनिल भोर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनिल बाणखेले, जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर, रवींद्र करंजखेले, सरपंच अंकुश लांडे, उद्योजक भाऊसाहेब सावंत आदी मान्यवर सहभागी झाले होते.