Imagine AI Tool : Meta ने त्याच्या टेक्स्ट टू इमेज जनरेशन AI टूलचे स्टँडअलोन व्हर्जन, Imagine लाँच केले आहे. आता तुम्ही मेसेजिंग अॅप व्यतिरिक्त वेबसाइटद्वारे हे टूल ऍक्सेस करू शकता. हे टूल गेल्या महिन्यात कंपनीच्या कनेक्ट इव्हेंटमध्ये दाखवण्यात आले होते आणि आता ते प्रत्येकासाठी लाइव्ह(उपलब्ध) आहे. तुम्ही imagine.meta.com वेबसाइट वर जाऊन हे टूल वापरू शकता. लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला एक मजकूर प्रॉम्प्ट द्यावा लागेल आणि हे टूल तुम्हाला प्रॉम्प्ट जुळणारे 4 फोटो दाखवेल.
AI ने बनवलेल्या फोटोवर असेल वॉटरमार्क…
AI टूल्सचा गैरवापर टाळण्यासाठी, Meta ने त्याच्या Imagine AI टूलमध्ये वॉटरमार्कचे फिचर जोडले आहे. यामुळे जेव्हा तुम्ही एआय टूल वापरून फोटो तयार कराल तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला वॉटरमार्क दिसेल. याशिवाय, कंपनी एका अदृश्य (invisible) वॉटरमार्किंग प्रणालीवर काम करत आहे. ज्यामुळे फोटो क्रॉप, एडिट किंवा स्क्रीनशॉट केला तरीही वॉटरमार्क दिसेल.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे, मजकूराद्वारे फोटो तयार करण्यासाठी, मेटा खाते (meta account) असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे खाते नसल्यास, तुम्ही Google, Facebook किंवा Instagram सह लॉग इन करू शकता.
कंपनी अनेक नवीन AI फिचरवर करत आहे काम…
मेटा त्याच्या अॅप्समध्ये डझनभर नवीन जनरेटिव्ह एआय फिचरची चाचणी (Testing) करत आहे. कंपनी Instagram मध्ये “Expander” नावाच्या फिचरवर काम करत आहे जे वापरकर्त्यांना कथांमधील लँडस्केप फोटोला पोर्ट्रेटमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता देईल. याशिवाय, कंपनी मेटा एआय चॅटवर रील्सलाही सपोर्ट करत आहे. याचा फायदा असा होईल की, तुम्ही चॅटबॉटच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर म्हणून रील्स देखील मागवू शकता.
उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या टूलव्दारे प्रवासाचे ठिकाण आणि त्याच्याशी संबंधित रील्स दाखवण्यासाठी विनंती करू शकता.