मुंबई – जगभरात इंस्टाग्राम वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असते, सोशल मीडियाचा सर्वात जास्त वापरला जाणारा प्लॅटफॉर्म म्हणून इंस्टाग्राम ची ओळख आहे. हेच इंस्टाग्राम दरवेळेस आपल्या युजर्सना काहीना काही नवीन गोष्टी देण्याचे प्रयत्न करत असते. आता असेच एक हटके फीचर इंस्टाग्राम घेऊन येणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे.
काय आहे इन्स्टाग्रामचे नवीन फीचर-
याआधी इंस्टाग्रामच्या बायोमध्ये केवळ एकच लिंक ॲड करता येत होती. मात्र आता येणाऱ्या नवीन फीचरनुसार इन्स्टाग्राम युजर्सना आपल्या बायोमध्ये 5 लिंक ॲड करता येणार आहेत. त्यामुळे व्हिजिटरला तुम्ही अॅड केलेल्या सर्व लिंक्स दिसणार आहे. या नवीन फीचरमुळे तुम्ही मल्टीपल सोशल मीडिया अकाऊंट ॲड करू शकणार आहात. त्याच बरोबर तुम्ही तुमची वेबसाईट, यूट्यूब चॅनल तसेच स्वतःचा किंवा दुसऱ्याचा एनजीओ, व्यवसाय देखील प्रमोट करू शकता. यामुळे तुम्हाला अधिक पैसे कमावण्यास मदत होऊ शकते.