गुवाहाटी – शिवसेनेचे तब्बल 41 ते 43 आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यानंतर ते सुरतहून गुवाहाटीला रवाना झाले आहे. यानंतर मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची भेट घेतली. कॉनराड संगमा हे नॅशनल पीपल्स पार्टीचे प्रमुख असून भाजप समर्थक आहेत. यामुळे भाजपनेच त्यांना चर्चेसाठी पाठवल्याची चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंड हे भाजपने घडवून आणल्याचा आरोप शिवसेनेकडून होत आहे. या बंडात 50 टक्के भाजप आणि 50 टक्के ईडीचा वाटा असल्याचा आरोपही अपक्ष आमदाराने केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक तज्ज्ञांनी या सर्व कटामागे भाजप असल्याचा दावा केला जात आहे. त्यात अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांसोबत भाजप नेतेही दिसून आले आणि आज थेट भाजप समर्थक मेघालयचे मुख्यमंत्री बंडखोर आमदारांच्या भेटीला आल्याने त्या कॉन्स्परसी थिअरीवर शिक्कामोर्तब केला जात आहे.