Jyoti mete । लोकसभा निवडणुकीत हळूहळू संततधार आणि विरोधक आपल्या याद्या जाहीर करतायेत. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून महायुतीत असलेल्या छोट्या पक्षांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये विशेष म्हणजे रासपचे प्रमुख महादेव जानकर आणि शिवसंग्रामचे दिवंगत प्रमुख विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचा समावेश होता. मात्र सगळ्यात भाजपने आपला वेगळा डाव टाकला आहे. महादेव जानकर यांना महायुतीकडून एक जागा देणार असल्याची घोषणा केली. त्यातच आता ज्योती मेटे यांनीदेखील देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतली.
देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट Jyoti mete ।
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ज्योती मेटे यांनी त्यांची भेट घेतली. ज्योती मेटे या बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. ज्योती मेटे यांचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश होईल, अशी चर्चा होती. पण त्यानंतर आता ज्योती मेटे फडणीसांच्या भेटीसाठी आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ज्योती मेटे भाजपकडून लढणार ? Jyoti mete ।
ज्योती मेटे या बीडमध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्या शरद पवार गटात प्रवेश करुन बीडमधून निवडणूक लढणार अशी माहिती समोर येत होती. पण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. बजरंग सोनवणे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
ज्योती मेटे यांना पक्षाकडून उमेदवारीदेखील मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता ज्योती मेटे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेल्या आहेत. या भेटीत नेमकी काय चर्चा होते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजप ज्योती मेटे यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देणार की दुसरं काही आश्वासन ज्योती मेटे यांना दिलं जातं? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.