शिक्रापूर, (वार्ताहर)- वंचित बहुजन आघाडीसह वंचितच्या समविचारी संघटनांची बैठक (दि.५) रोजी शिक्रापूर चाकण रोड परिसरात होणार असून यावेळी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा व निवडणूक आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी वंचित बहुजन पक्षासह अन्य संघटनाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत,
मात्र यावेळी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या बांदल यांच्या उमेदवारीला विरोध होण्याची शक्यता असल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने सांगितले आहे, मात्र, यामध्ये कोणाची खेळी की कोणाचा काही डाव हे बैठकीनंतर होणाऱ्या घडामोडीनंतरच समोर येईन मात्र,
बांदल यांच्या यापूर्वी झालेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या गुन्हेगारी बाबतच्या घटना तसेच काही लोकांचे आरोप कित्येकदा नागरिकांच्या फोनमधील संपर्काच्या त्रुटी या बाबी विरोधाला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.