शिक्रापूर (वार्ताहर)- येथील सी. एस. भुजबळ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संघाने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या संघाचे परिसरातून कौतुक होत आहे.
सी. एस. भुजबळ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संघाने नुकत्याच इंग्लिश मिडीयम स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने महाबळेश्वर पाचगणी येथे आयोजित राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भुजबळ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या 12 वर्ष, 14 वर्षे व 17 वर्षे वयोगटातील तीनही संघांनी सुवर्णपदक पटकाविले आहे.
या तीनही संघातील सर्व खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक स्वप्नील भिसे, चेतन जाडकर यांनी मार्गदर्शन केले. तर सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शकांचे भुजबळ इंग्लिश मिडीयम स्कूल संस्थचे अध्यक्ष विक्रम भुजबळ, उपाध्यक्ष सागर सायकर, प्राचार्य पाचार्य ए. जे. जोमान, राणी भुजबळ, अपर्णा लोखंडे यांनी अभिनंदन केले असून सर्व खेळाडूंचे परिसरातून कौतुक होत आहे.