शिक्रापूर, (वार्ताहर) – धानोरे (ता. शिरूर) येथील एका युवतीला मे 2015 मध्ये शेतात खाऊचे अमिष दाखवून अत्याचार केल्याने ती गर्भवती झाली होती. त्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाला न्यायालयाने 10 वर्षे सक्त मजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रतापनाना उर्फ प्रताप बबनराव भोसुरे (वय 59 रा. धानोरे ता. शिरूर) असे सक्तमजुरी सुनावलेल्याचे नाव आहे. धानोरे येथे मे 2015 मध्ये युवती शेतात गेलेली असताना गावातील प्रताप भोसुरेने युवतीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केला; मात्र त्यांनतर काही दिवसांनी युवतीचे पोट दुखू लागल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतर ती गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितल्याने युवतीच्या पालकांनी फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी प्रतापवर बलात्कार प्रकरणी गुन्हे दाखल करत अटक केली होती.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ व दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक निरीक्षक हेमचंद्र, उपनिरीक्षक रज्जाक शेख, महिला पोलीस निरीक्षक माधुरी झेंडगे, आकाश पवार, विद्याधर निचित, पोलीस हवालदार कृष्णा कानगुडे,
सचिन भागवत, पोलीस शिपाई प्रफुल्ल सुतार, ज्ञानदेव सोनवणे यांनी आरोपीबाबत योग्य पुरावे न्यायालयात सादर केले तर सरकारी वकील लिना पाठक यांनी न्यायालयात योग्य बाजू मांडली असताना पुणे जिल्हा सत्र न्यायालय डी. पी. रागीट यांनी सरकारी वकील व पोलीस अधिकार्यांची बाजू ऐकून घेत प्रतापला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.