दरड कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सिमेंट, खडी व वाळू मिश्रणाचा थर चढविण्याची तयारी सुरु

बोपखेल-आळंदी मार्ग ः 15 लाखांचा खर्च, 15 दिवसांत होणार काम पूर्ण

वडमुखवाडी -आळंदी-पुणे बीआरटी मार्गालगतच्या धोकादायक डोंगरकडा कोसळण्यापासून रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोपखेल ते आळंदी या मार्गावर उभारलेल्या बीआरटी मार्गालगतच्या 50 फूटी डोंगर आहे. या डोंगराची कडा काही दिवसांपूर्वी कोसळली होती. याबाबत दै. “प्रभात’ मध्ये 10 एप्रिल रोजी ही दरड धोकादायक ठरु शकते, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत, तातडीने महापालिकेने येथील पदपथ बंद केला होता. त्यानंतर आता दरड कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याअंतर्गत “झनायटींग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सिमेंट, खडी व वाळू मिश्रणाचा थर चढविण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोपखेल ते आळंदी रस्त्यापर्यंत बीआरटी मार्ग विकसित करण्यात आला आहे. याठिकाणचा बीआरटी रस्ता करण्यासाठी रस्ता रुंदीकरण करताना डोंगर पोखरावा लागला आहे. या पोखरलेल्या डोंगरालगतच गौण खनिज उत्खनन सुरू असल्याने बसणाऱ्या हादऱ्यांमुळे सैल झालेली कडा पदपथावर कोसळली होती. मात्र, सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही बाब दैनिक “प्रभात’ ने निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने याठिकाणी धोकादायक डोंगरकडा कोसळण्याची शक्‍यता असल्याचा फलक लावत, पादचाऱ्यांना याठिकाणाहून ये-जा करण्यास मनाई केली होती.

दरम्यान, हा फलक लावल्यानंतरदेखील काही ठिकाणच्या कडा पदपथावर कोसळल्या होत्या. त्यामुळे अपघात घडण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. महापालिकेच्या वतीने याठिकाणी प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. “झनायटींग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सिमेंट, खडी व वाळू मिश्रणाचा थर चढविण्यात येत आहे. या उपाययोजनेमुळे कडा कोसळण्याचा धोका कमी होईल.

याठिकाणच्या डोंगरकडा धोकादायक झाल्याने, त्या कोसळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे याठिकाणी नियमित खर्चातून झनायटींग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सिमेंट, खडी व वाळू मिश्रणाचा थर चढविण्यात येणार आहे. या कामाकरिता सुमारे 15 लाख रुपये खर्च येणार आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

– डी. डी. पाटील, उपअभियंता

याठिकाणच्या डोंगरकडा धोकादायक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर, त्यावर उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळा सुरु होईपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

– विजय भोजने, प्रवक्‍ता, बीआरटीएस, पिंपरी-चिंचवड महापालिका

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)