पुणे(प्रतिनिधी) – शहरात पडलेल्या वादळी पावसामुळे मंगळवार पेठेत इमारतीवर उभारलेला टॉवर आणि संचेती पुला जवळ असलेला दिशा दर्शक फलक कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र अशा स्थितीत देखील रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत असलेल्या पुणे पोलिसांचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी कौतुक केले आहे.
शुक्रवारी रस्त्यावर आपली ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांचीही मोठी तारांबळ उडाली. विश्रामबाग वाड्यासमोरील रस्त्यावर ड्युटीवर असलेल्या पोलिसांचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या रस्त्यावर पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. त्यांनी रस्त्याच्या बाजूला तात्पुरत्या तंबूची व्यवस्था केली आहे. पण वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पोलिसांचा हा तात्पुरता निवाराही उडून जात होता. मात्र तेथील पोलिसांनी मोठी कसरत करत १०-१५ मिनिटे मुसळधार पावसामध्ये उभे राहून तंबू कसाबसा धरुन ठेवला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महापौर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना सलाम ठोकला. पोलिसांच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी आपल्या ट्विटरवर पुणे पोलिसांनी टॅग केले.
Thank you Mayor @mohol_murlidhar .
With u leading in the front,
We will do more … https://t.co/UwzMUHW7bG— CP Pune City Police (@CPPuneCity) May 1, 2020
महापौरांच्या या ट्विटवर पुणे पोलिस आयुक्तांनीही रिप्लाय दिला आहे आणि आभार मानले. ‘तुमची साथ असेल तर भविष्यातही आमचे कार्य असेच सुरू राहील’, अशा आशयाचे ट्विट पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1202569440082759/