राज्यमंत्री संजय भेगडे, सुनील शेळके रिंगणात
वडगाव मावळ – मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सात जणांचे अज दाखल झाले आहेत. गुरुवारी विद्यमान आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी भाजपकडून तर सुनिल शेळके यांनी राष्ट्रवादीकडून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळ मुळशी प्रांताधिकारी सुभाष भागडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळचे तहसीदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस उरला असून उद्या खूपच गर्दी होणार असल्याने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संजय विश्वनाथ भेगडे यांनी भाजपच्या वतीने, गुलाबराव गोविंद म्हाळसकर यांनी भाजपच्या वतीने, सुनील शंकरराव शेळके (राष्ट्रवादी कॉंग्रेस), रवींद्र आप्पा भेगडे (अपक्ष),मंदाकिनी शशिकांत भोसले (बहुजन समाज पार्टी) यांनी नामनिर्देशन पत्र तर धर्मपाल यशवंतराव तंतरपाळे यांनी अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. भाजपतर्फे राज्यमंत्री संजय भेगडे यांनी तर रवींद्र आप्पा भेगडे यांनी शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी तहसीलदार मधुसुदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, आर. एल. कांबळे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शुक्रवार (दि.27) रोजी मोरेश्वर गंगाधर बवरे, अभिजीत अनिल आपटे, बाळासाहेब नेवाळे, खंडू बाळू तिकोणे, नामदेव सावळेराम दाभाडे, शांताराम नरवडे, रवींद्र आप्पा भेगडे, मंदाकिनी शशिकांत भोसले, सागरा निर्गुण बोडके, राजेश शशिकांत खांडभोर यांचे दोन एकूण 11 नामनिर्देशन पत्र यांनी घेतले.
सोमवार (दि.30) रोजी सुधाकर शंकरराव शेळके, चंद्रकांत आप्पासाहेब सातकर, संभाजी शिवराम वाघमारे, महेंद्र कचरू ओव्हाळ, रवी रामभाऊ पंडागळे, गोपाळ यशवंतराव तंतरपाळे एकूण सहा नामनिर्देश पत्र घेतले. मंगळवार (दि.1) रोजी दत्तात्रय गोदू शिंदे, बाबूलाल म्हातारबा गराडे, अतुल चंद्रकांत राऊत, विशाल वसंतराव वहिले, बाबुराव आबाजी वायकर, मुकेश मनोहर अग्रवाल, धर्मपाल यशवंतराव तंतरपाळे, विलास सखाराम ढोरे, गोरख सुरेश जांभुळकर, रवींद्र आप्पा भेगडे, किरण शांताराम साळवे, गुलाब गोविंद म्हाळसकर, सुनील शंकरराव शेळके, सारिका सुनील शेळके, दीपक यशवंत लोहर, दादाभाऊ गबाजी ओव्हाळ एकूण 16 नामनिर्देशन पत्र, गुरुवार (दि.3) रोजी मुकेश मनोहर अग्रवाल, संजय गदिया, रमेश ओव्हाळ, शशांक नाईक, महेश विलास आल्हाट, ज्ञानेश्वर महिपती केदारी, शशिकांत भीमराव जाधव, संतोष रंजन लोखंडे, सुनील शंकरराव शेळके एकूण 9 नामनिर्देशन पत्र असे गुरुवार पर्यंत एकूण 42 नामनिर्देशन पत्र घेतले आहे.