मावळातील 29 गावांना मिळाले नवीन ‘कारभारी’

भाजपा, महाविकास आघाडीमध्ये वर्चस्वावरून दावे-प्रतिदावे

वडगाव मावळ – मावळ तालुक्‍यातील निवडणूक झालेल्या 57 ग्रामपंचायतींपैकी 29 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बुधवारी (दि. 24) झाली. 6 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवडून बिनविरोध झाली आहे. तर उर्वरीत ग्रामपंचायतींवर कोणत्या पक्षाची सत्ता आहे यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी 29 ग्रामपंचायतींपैकी 19 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आहे असा दावा केला आहे तर भाजपा तालुका शहराध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी 13 ग्रामपंचायतीचे सरपंच व 2 ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाजपाचे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नेमक्‍या ग्रामपंचायतीवर कोणत्या पक्षाची सत्ता असणार आहे. याची उत्सकुता नागरिकांमध्ये आहे. तर गुरुवारी (दि. 25) उर्वरित 28 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच निवडणुका होणार आहे.

बिनविरोध ग्रामपंचायती
सांगावडे, येलघोल, आढे, सोमाटणे, नवलाख उंब्रे, पाचाणे या गावांचे सरपंच, उपसरपंच बिनविरोध
झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.