शिलाटणे ग्रामपंचयात उपसरपंचपदी निर्मला भानुसघरे बिनविरोध

कार्ला – मावळ तालुक्‍यातील शिलाटणे ग्रामपंचयात उपसरपंचपदी निर्मला बाळासाहेब भानुसघरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी शिलाटणे गावाने आदर्श निर्माण करत सरपंचपदासह सर्व सदस्य बिनविरोध निवड करत ग्रामपंचयात बिनविरोध निवड केली होती.

रविवारी (दि. 14) उपसरपंचपदाची निवड देखील बिनविरोध करण्यात आली. सरंपच गुलाब आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामसेवक आनंदा पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचयात कार्यालयात उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत निर्मला भानुसघरे यांचा एकमेव अर्ज आल्याने भानुसघरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

निवड झाल्यानंतर सरंपच गुलाब आहिरे, सदस्या कांचन शरद भानुसघरे, मनिषा दत्तात्रय भानुसघरे, माधुरी रामदास भानुसघरे, आश्‍विनी मच्छिंद्र भानुसघरे, जनाबाई विनायक कोंडभर, रुपाली दत्ता कोंडभर, सोनाली सुशील येवले, सदस्य शरद आहिरे यांनी पुष्पगुच्छ देत भानुसघरे यांचा सत्कार केला.

शिलाटणे : ग्रामपंचयात उपसरपंचपदी निर्मला बाळासाहेब भानुसघरे यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सन्मान करताना दिपक हुलावळे, भरत मोरे, सुरेश गायकवाड व मान्यवर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.