Lok Sabha Election 2024| जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांत मतदारांची संख्या 82 लाख 92 हजार 951 इतकी झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्वांत मोठा मतदारसंघ हा चिंचवड असून, त्यात तब्बल 6 लाख 12 हजार 880 मतदार आहेत. तर सर्वात लहान मतदारसंघ हा कसबा पेठ असून या मतदारसंघात 2 लाख 76 हजार389 इतके मतदार आहेत.
दरम्यान, पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून शहरात सर्वांत मोठा मतदारसंघ हा हडपसर असून या मतदारसंघात 5 लाख 77 हजार 630 मतदार आहेत. मागील अडीच महिन्यांत जिल्ह्यातील मतदार यादीत एक़ूण 1 लाख 65 हजार 932 नव्या मतदारांची नावे समाविष्ट झाली आहेत. Lok Sabha Election 2024|
जिल्ह्यातील मतदारांची सद्यस्थिती
पुरुष मतदार : 43 लाख 28 हजार 954
महिला मतदार : 39 लाख 63 हजार 269
तृतीयपंथी मतदारांची संख्या : 728
पुणे लोकसभा मतदार संघ
विधानसभा मतदारसंघ – मतदार संख्या
वडगावशेरी – 4,63,671
शिवाजीनगर- 2,76,920
कोथरुड – 4,10,634
पर्वती – 3,39,375
पुणे कॅन्टोन्मेंट – 2,80,400
कसबा पेठ -2,76,389
एकूण मतदार – 20,47,389
बारामती मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघ – मतदार संख्या
दौंड- 3,03,982
इंदापूर – 3,23,074
बारामती – 3,67,876
पुरंदर – 4,27,218
भोर- 4,06,105
खडकवासला – 5,34,152
एकूण – 23,62,407
शिरुर लोकसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघ – मतदार संख्या
जुन्नर -3,11,564
आंबेगाव – 3,01,162
खेड- 3,51,397
शिरुर- 4,36,876
भोसरी- 5,48,612
हडपसर-5,77,630
एकूण – 25,27,241
मावळ लोकसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघ – मतदारांची संख्या
मावळ- 3,72,730
चिंचवड- 6,12,880
पिंपरी- 3,70,304
एकूण -13,55,914
(पनवेल, कर्जत, उरण हे तीन विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यातील आहेत.)
हेही वाचा:
विदर्भात अवकाळीसह गारपीटीचा तडाखा; आंब्यासह लिंबू भाजीपाला पिकांना मोठा फटका