दिल्लीतील टिकरी पीव्हीसी मार्केटमधील प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आग एवढी भीषण आहे की आगीचे लोट कित्येक किलोमीटरपर्यंत पसरले होते. सध्या पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
दिल्ली परिसरात आगीच्या घटना वारंवार सुरूच आहेत. याआधी गुरुवारी रात्री देखील गोदामाला आग लागली होती. आता टिकरी पीवीसी बाजार इथे प्लास्टिक गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या घटनेत जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही.