मुंबई – ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू मिशेल मार्श याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे आता त्याला त्या मालिकेतून माघार घ्यावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यामुळे आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिट्लस संघाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा चार गडी राखून पराभव केला व थाटात सुरुवात केली. मात्र, आता साखळीतील पुडील लढतींसाठी त्यांना मार्शच्या संघात दाखल होण्याची गरज होती. टी-20 क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूच सर्वात जास्त गरजेचे असतात व त्यामुळे मार्शच्या दुखापतीने दिल्ली संघ अडचणीत येणार आहे.
क्षेत्ररक्षणाचा सराव करताना मार्शची कंबर दुखावली. त्याचे स्कॅनिंग करण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच येइल व त्यानंतरच तो पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसह आयपीएल स्पर्धेतही खेळेल का ते स्पष्ट होणार आहे.