Bus Accident | jawan | election duty – छत्तीसगडमधील बस्तर येथे इलेक्शन ड्युटीसाठी जाणाऱ्या सीआरपीएफ जवानांची बस उलटल्याने नऊ सुरक्षा जवान जखमी झाले. मध्य प्रदेश या सुरक्षा जवानांची दुसरी बटालियन सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणूक ड्युटीकडे निघाली होती. त्यावेळी बस्तर जिल्ह्यातील दिलमिली जवळ हा अपघात झाला.
यात नऊ जवान जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बस्तर लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. तेथील ड्युटी संपवून हे जवान दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी नियोजित ठिकाणी जात होते. त्यावेळी ही बस उलटली. । Bus Accident | jawan
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आज पहाटे झाला. बसच्या चालकाने वाटेत समोर आलेल्या एका लहान वाहनाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याने ही दुर्घटना घडली. । Bus Accident | jawan | election duty