कोळकी येथे विवाहितेची आत्महत्या

फलटण  – कोळकी (ता. फलटण) येथील नरसोबानगर येथील कल्याणी सोमनाथ माने (वय 27) हिने सोमवारी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमनाथ माने हे सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कामावरुन घरी आले. यावेळी पत्नी कल्याणी हिने आपल्याला गणपतीच्या आरतीसाठी जायचे आहे. त्यासाठी हार घेऊन या असे सोमनाथ यांना सांगितले. ते हार आणण्यासाठी बाजारात गेले व थोड्याच वेळात हार घेऊन माघारी आले असता त्याच्या बेडरुमचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर त्यांनी बेडरुमचा दरवाजा तोडून आत पाहिले तर पत्नी कल्याणी हिने ओढण्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. माने यांना तीन वर्षांची एक व दीड वर्षांची एक मुलगी आहे. त्यांचे मूळ गाव हे सांगली जिल्ह्यातील गोमेवाडी असून सोमनाथ माने हे कमिन्स कंपनीत नोकरीला असून कल्याणी या गृहिणी होत्या. या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस उपनिरीक्षक देसाई तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.