चेन्नई – आपले लग्न कायम आठवणीत रहावे यासाठी लोकं अनेक शकली लढवत असतात. कोयम्बतूर येथे ही एक असाच हटके विवाह सोहळा पाहायाला मिळाला आहे. येथे पेशाने इंजीनिअर असलेल्या नवरा – नवरीने तब्बल 60 फूट खोल समुद्रात एकमेकांना माळा घालून लग्न केले आहे.
तमिळनाडू येथील नीलकंरई समुद्रावर उभे राहत चिन्नादुरई आणि श्वेता यांनी लग्नाच्या मुहूर्ताची वाट पाहिली. जसा मुहूर्त आला तशी त्या दोघांनी समुद्रात उडी घेतली आणि एकमेकांना माळा घालत लग्न केले. यावेळी त्यांनी पारंपारिक लग्नाचा पोशाखही परिधान केलेला होता.
श्वेता ही कोयम्बतूर येथील रहिवासी आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या होण्याऱ्या पतीने खोल समुद्रात जाऊन लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला तेंव्हा खुप विचित्र वाटले. खुप भिती वाटली. मात्र, अखेरीस प्रस्ताव मान्य केला आणि खोल समुद्रात विवाह केला.
तिरूवन्नमलई येथील रहिवासी नवरदेव चिन्नादुरई ने म्हटले की, लहानपणापासून पोहण्याचा छंद होता. 12 वर्षाचा असल्यापासून स्कूबा डाइविंग करत आहे. ज्यांनी पोहायला शिकवले त्यांनीच समुद्रात पाण्यात लग्न करण्याची आयडीया दिली, असे चिन्नादुरई ने सांगितले.
चिन्नादुरई यांनी सांगितले की, ते दोघे तब्बल 45 मिनीटे पाण्याखाली होते. त्यांनी सर्वप्रथम पाण्यात बुके देऊन श्वेताला प्रपोज केले. प्रपोजलनंतर दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळा घातल्या. समुद्राला साक्षी मानून शपथ घेतली आणि फेरेही मारले असे त्यांनी सांगितले.