मार्करम तिसऱ्या कसोटीस मुकणार

रांची: विशाखापट्टणम आणि पुणे येथे झालेल्या कसोटी सामन्यांतील पराभवाने मालिका गमावलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला आणखी एक धक्का बसला आहे.

या मालिकेत सरस कामगिरी करणारा एडन मार्करम याला दुखापत झाल्याने या मालिकेतील अखेरच्या सामन्यातुन माघार घेतली आहे.

मार्करमच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली असुन ती लवकर बरी होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. येत्या शनिवारपासून येथे मालिकेतील अखेरचा तिसरा कसोटी सामना होणार आहे.

विशाखापट्टणम आणि पुण्यात झालेल्या सामन्यांत विजय मिळवित भारताने ही मालिका आधीच जिंकली आहे. परभवामुळे व्यथीत झालेल्या माक्ररमने रागाच्या भरात हात कोणत्यातही कठीण वस्तुवर आपटला होता, त्यामुळेच त्याला ही दुखापत झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.