नव्या ट्रेंडच्या राख्यांची बाजारात चलती

पुणे – भावा-बहिणीच्या अतूट बंधनाचा दिवस म्हणजे रक्षाबंधन अगदी काही दिवसांवर येउन ठेपला आहे. यासाठी बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. स्थानिक बाजारपेठांबरोबरच तरुणाईची पसंती असलेली ऑनलाईन बाजारपेठही रक्षाबंधनासाठी नव्या ट्रेंडच्या राख्या घेउन तयार आहे. तरुणाईसाठी सध्या स्टाईल, फॅशन महत्वाची असल्याने त्याप्रमानेच  राख्याही बाजारात उपलब्ध आहेत.

यंदा सगळ्यात जास्त ‘कूल ट्रेंड’ आहे तो म्हणजे ‘वीर’, ‘भाई’, ‘ब्रो’, किंग भाई लिहिलेल्या आणि धाग्यात गुंफलेल्या राखीचा. अॅक्रेलिक आणि लाकूड या दोन प्रकारांत या राख्या उपलब्ध आहेत. अॅक्रेलिकला सोनेरी रंग असणारी आणि राखीवर कोरलेल्या शब्दाने त्याचं व्यक्तिमत्त्व सांगणारी ‘सोन्याची राखी’ बाजारात मोठया प्रमाणात दिसत आहे. ऑनलाईन मार्केट म्हणजे अॅमेझोन, फ्लिपकार्ट किंवा तत्सम साइट्‌सवरही या राख्या उपलब्ध आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here