मुंबई – कविराज भूषण यांनी रचलेली अप्रतिम रचना “इंद्रजिमी जृंभ पर’ ही काव्यरचना कानावर पडताच अंगाअंगात स्फुर्ति संचारते. “इंद्रजिमी जृंभ पर बाडव सअंभ पर रावण सदंभ पर रघुकुलराज है।तेज तमअंस पर कन्ह जिमि कंस पर त्यो म्लेंछ बंस पर शेर शिवराज है।’ या अजरामर स्तुतीकाव्याचा इथं उल्लेख करण्यामागं एक विशेष कारण आहे. या काव्यातील “शेर शिवराज है’ हे ध्रुवपद आता एका मोठ्या मराठी सिनेमाचं शीर्षक बनलं आहे.
फर्जंद, फत्तेशिकस्तच्या यशस्वी घोडदौडनंतर दिग्पाल लांजेकर आता आपला आगामी ‘शेर शिवराज’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. तर, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सुद्धा सांगण्यात आली आहे. या संदर्भातील एक पोस्ट दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
View this post on Instagram
“आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला. सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह…शेर शिवराज…29 एप्रिल 2022…हर हर महादेव”. या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. सर्वच चाहते आता चित्रपटाची प्रतीक्षा करत आहे.
View this post on Instagram
शिवकालीन इतिहासातील अफझलखान वध ही घटना युद्धाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याच अफझलखानाचा वध हा केवळ शत्रूचा वध नव्हता, तर शिवाजी महाराजांनी त्यात उत्तम युद्धतंत्र आणि मानसिक दबावतंत्राचा अंतर्भाव केला होता. याच युद्धनीतीवर “शेर शिवराज है” हा चित्रपट आधारित आहे.