मराठी भाषा दिवस: सात हजार विद्यार्थ्यांचे मोदींना पत्र

पुणे: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता पुण्यातील विद्यार्थ्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावी, यासाठी तब्बल सात हजार विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहेत. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुढाकार घेतला.

या उपक्रमामध्ये पुण्यातील विविध शाळांना सहभागी करुन घेण्यात आले. शाळांमधील मुलांनी मराठीत पत्र लिहून मराठीला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी केली. त्याचबरोबर सह्यांची मोहीम देखील राबविण्यात आली.

यासंदर्भात “मनविसे’चे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव म्हणाले, मनविसेकडून मराठी भाषा दिनानिमित्त सात हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही पत्र लिहित आहोत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध घटक प्रयत्न करत आहेत. या मागणीत विद्यार्थी देखील मागे नाहीत. म्हणून या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही ही पत्रे पाठवत असल्याचे म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.