#T20WorldCup : आॅस्ट्रेलिया महिला संघाचा बांगलादेशवर ८६ धावांनी विजय

कॅनबरा : एलिसा हीली आणि बेथ मूनी यांच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलिया महिला संघाने टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत गुरूवारी झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात बांगलादेशचा ८६ धावांनी पराभव करत विजय नोंदविला. एलिसा हीली या सामन्याची मानकरी ठरली.

आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एलिसा हीलीच्या ५३ चेंडूत (१० चौकार व ३ षटकार)८३, बेथ मूनीच्या ५८ चेंडूत (९ चौकार) नाबाद ८१ आणि एश्ले गार्डनरच्या ९ चेंडूत (३ चौकार व १ षटकार) नाबाद २२ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात १ बाद १८९ अशी मजल मारली होती. बांगलादेशकडून सल्मा खटून हिने ४ षटकात ३९ धावा देत १ विकेट घेतली.

प्रत्युत्तरात विजयासाठी १९० धावांचा पाठलाग करताना बागंलादेशच्या संघास २० षटकात ९ बाद १०३ धावसंख्येपर्यतच मजल मारता आली. बांगलादेशकडून फलंदाजीत फर्गाना होकने ३६(३५), निगार सुल्तानाने १९(३२), रूमाना अहमदने १३(१२) आणि शमीना सुल्तानाने १३(०९) धावांची खेळी केली.

आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मेगन शूटने ४ षटकात २१ धावा देत ३, जेस जोनसनने ४ षटकात १७ धावा देत २ विकेट घेतल्या. तर, ऐनाबेल सदरलैंड आणि निकोला कैरी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.