कुसरो वाडियात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

पुणे – दि २७ फेब्रुवारी रोजी कुसरो वाडिया महाविद्यालयाच्या विद्युत विभागात प्रथम ते तृतीय वर्ष विद्युत अभियांत्रिकीच्या तसेच इतर सर्व शाखांमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साहात मराठी दिन साजरा केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रथमतः विद्युत-विभागप्रमुख सौ मानकर यांनी उपस्थित सर्व विभागप्रमुख शिक्षकवृंद आणि सहकारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे स्वागत करून दु.२ वा. ग्रंथप्रदर्शनाला सुरुवात केली.

उपस्थित विद्यार्थ्यांपैकी विद्युत विभागातील कु. कविता माळी आणि अणुविद्युत व दूरसंचारण विभागातील कु. प्रेषित गुजर या विद्यार्थ्यांनी उत्स्फुरतेने स्वरचित कवितांचे वाचन केले.
या कार्यक्रमासाठी नावडे सर, यांनी राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्याशी संबधीत साधारण ६०पुस्तके, गर्गेसर यांनी आपल्या संग्रहातील काही अवांतर वाचनासंबंधित ३० पुस्तके अवलोकनार्थ ठेवली होती. विद्यार्थ्यांनीही जवळपास १००पुस्तके प्रदर्शनार्थ मांडली होती. ग्रंथप्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्रंथप्रेमी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रस्तुत पुस्तकांचे अतिशय उत्साहात अवलोकन व रसग्रहण केले.

ग्रंथप्रदर्शन काळात संस्थेचे प्राचार्य व्ही. आर .राव, अणुविद्युत विभागप्रमुख डॉ. चांडक, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख ए एस शेलार, विद्युत विभागप्रमुख के. जी. मानकर यांनी प्रदर्शन पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर प्रदर्शनास संगणक विभागप्रमुख ए.स. जांभळे, प्रशिक्षण व स्थापना अधिकारी प्रा.डी एस बापट,प्रा.मेहता प्रा.शुभांगी वर्मा प्रा.चिंचणीकर,प्रा.साने आणि प्रशासकीय कार्यालयातील काणे मॅडम आणि ग्रंथालयातील मखरे मॅडम यांनीही विद्युत विभागात येऊन प्रदर्शनास भेट दिली.विद्युत विभागातील प्रा.नावडे, प्रा. गोतसुर्वे, प्रा.गर्गे, प्रा. कु. गायकवाड, प्रा. कु. उल्हे, कु. घुले व श्री. कोकाटे याप्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी स्वयंसेवक विदयार्थांनी विद्युत विभागातील मुख्य प्रयोगशाळा सुंदररित्या सजवली होती. त्यासाठी त्यांनी मराठी बाराखडीचा पताका म्हणून तसेच मराठी संत, साहित्यिक, लेख,कवी- कवयत्री ,ग्रंथकार, यांच्या रंगीत कृष्णधवल छायाचित्रांचा साज गुंफून आणि पताका सजवून सुंदर उपयोग केला होता. तसेच प्रतिमाप्रेक्षकाच्या द्वारे ध्वनिचित्रफीत हि प्रदर्शित केली होती.
सदर कार्यक्रमाचे नियोजन विद्युत विभागातील प्रा.योगेश गर्गे यांनी केले होते.
समारंभाची सांगता संध्याकाळी ५ वाजता करण्यात आली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.