“दोन दिवसा अगोदर मराठा आरक्षण रद्द.. अजुन किती थुंकणार आमच्यावर? नितेश राणे

मुंबई – संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील सर्वच नेते एकमेंकावर राजकीय आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले असून, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नितेश राणे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात… “दोन दिवसा अगोदर मराठा आरक्षण रद्द.. काल महाराष्ट्र सरकारने 16000 पदांसाठी मेघा भरती जाहीर केली.. अजुन किती थुंकणार आमच्यावर?  या पेक्षा सरकारने जाहीर विष वाटप करावे.. या सरकारने तसा पण मुडदे पाडण्याचा कार्यक्रम हातात घेतलाच आहे.!” या आशयाचे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. सध्या नितेश राणे यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली होती. “मराठा आरक्षण रद्द झालं याला महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री कारणीभूत आहे. मी शिवसेनेत अनेक वर्षे काम केलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे, शिवसेना आणि शिवसेनेच्या नेत्यांना मराठा समजाला आरक्षण द्यायचं नव्हतं..’ असं नारायण राणे म्हणाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.